मी कधीतरी धोटभर पितो
आठवांत खोलवर रमतो
अचानक ठेचकाळतो
अन् वास्तवात येतो
वास्तवातले विस्तव उबदार असतीलही
पण तूझ्यासवे शहारणारा गारठाच
अल्हादायक असतो; असं का?
सहजंच… अर्थ काढू नकोस
आणि प्रसंग जोडू ही नकोस…
फक्त अस्वाद धे या क्षणाचे
तुझ्या - माझ्या असण्याचे..
अस्तित्व असतेच की असे
सभोवताली गिरकी घेण्याचे
इतकेच सांगायचे होते
शब्द शोधायचे होते बाकी
भावना अन् श्वासही तेच…
शाश्वतेत अनभिज्ञ झालेले
क्षितीजावर चहूदिशा खोळंबलेली
तुझ्या हनुवटीवरील चंद्राची कोर
आपल्या श्वासातले वादळ आणि
अमृत मंथनात पहूडलेला स्वर…
दृष्टीतला सुर्योदय तसाच आहे
या जन्मोजन्माच्या चिंरंतन
शक्ती आणि भक्तीच्या रास लीला
विजयोन्मादाने फडफडल्या पहाटे कधीतरी..
गहीऱ्या डोहात त्याचे विशेष काय?
खुदकन हास जरा, मजला हवेच काय?