ती होती त्या प्रत्येक
क्षणाला
जेव्हा तो तीचं गाणं
गुणगूणत होता
जेव्हा तो तीचं आभाळ विणत
होता
जेव्हा तो तीला शब्दबंध करत
होता
आता ती खरच बंदीस्त झालीये
कुठेतरी
तो एकटा वाटसरू या वाटेवरी
तीची गोड गाणी गुणगूणणारा
दुसर्यांच्या आभाळाला ठिगळं
लावणारा
खूप लोक असतात त्याच्या सोबतीला
एकलेपणा जीवघेणा वाटतो
क्षणा-क्षणाला
अजूनही ती असते त्याच्या सोबतीला
अन् उमटते त्याच्या
सृजनतेतून
लोक म्हणतात -
चित्र विक्षिप्त असतात
त्याची
गाणी अर्थपूर्ण पण न
उमगणारी
कला आहे पण व्यर्थ कलाकारी
काल ती भेटली मला
सांगत होती की,
‘मी कधी उमगलेच नाही त्याला,
वेडा तो, ना गवसला कधी स्वतःला...'
वेडा तो, ना गवसला कधी स्वतःला...'
1 comment:
Mast re....pan hi lagnanantar lihili asati tar jast yogya vatali asati...visheshtaha sagalyat shevatchi ol
Post a Comment