गुडूप झालेल्या काळोखात
गडद धुके दाटलेले
चिमणी एवढ्या प्रकाशात
आभाळ माझे पेटलेले...
उगवत्या रवीला वंदून
धुके सारे ओथंबले
धराच्या बाहेर चिऊने
आभाळ चोचीत घेतलेले...
चिऊताई देतेस का तुझे
आभाळ जरासे मजला?
उडालीकी हो भुर्रकन
घिरट्या घालित रानाला...
क्षितिज माझ्या मागावर
मी ही धावत सुटलो
गाठायाला आभाळ जरासे
संधीप्रकाष चिरकाल टिकलेले